सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपणारे सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूनंतरही आपला दानशूरपणा कायम ठेवला आहे. त्यांनी दहा हजार कोटींची संपत्ती सोडली असून इच्छापत्राच्या माध्यमातून नोकर, भाऊ-बहीण आणि श्वानासह टाटा यांचे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट शंतनू नायडू यांनाही आधार दिला आहे.
रतन टाटा यांनी रोजगार निर्मिती आणि देशाच्या संपत्तीमध्ये वाढ केली. हे करीत असताना त्यांनी माणुसकीही जपली. 9 ऑक्टोबर रोजी जगाचा निरोप घेतला, मात्र मृत्यूनंतरही त्यांनी माणुसकी जपली आहे. श्वानावर प्रेम करणाऱ्या टाटांनी आपल्या मृत्यूनंतर श्वानाची काळजी घेण्यासाठी मृत्युपत्रात संपत्ती सोडली आहे. जर्मन शेफर्ड जातीच्या ‘टीटो’ नावाच्या श्वानाची काळजी घेण्यासाठी त्यांनी निधीची तरतूद करून ठेवली आहे.