केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे अभिनेत्री रश्मिका मंदानाने दुःख व्यक्त केले आहे. वायनाडमधील भूस्खलन खरोखर खूपच भयंकर असून हे पाहून माझे हृदय तुटले आहे, अशा शब्दांत रश्मिकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर या दुर्घटनेसंबंधी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रश्मिकाने म्हटले की, ही घटना पाहून माझं हृदय तुटलं आहे. मला माफ करा… हे खरंच खूप भयंकर आहे. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते, असे रश्मिकाने म्हटले आहे. केरळमधील वायनाड जिह्यात मेप्पडीजवळ मंगळवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 156 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप मातीच्या ढिगाऱयाखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. ‘पुष्पा Š द रूल-पार्ट 2’ या चित्रपटात रश्मिका मंदाना दिसणार आहे. आधीच्या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली होती. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.