जामिनावर सुटलेल्या आसाराम बापूचे इंदूरमध्ये प्रवचन

अल्पवयीन आणि महिलांवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू सध्या जामिनावर बाहेर आहे. जामिनावर बाहेर असताना प्रवचन देण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई असताना आसाराम बापूने मात्र इंदूरमध्ये प्रवचन दिले आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे, असा आरोप केला जात आहे. न्यायालयाने दिलेल्या जामीन अटींचे उल्लंघन करून आसाराम लोकांना भेटत आहेत. समर्थकांना भेटत असून उपदेश करत आहे. इंदूर येथे प्रवचन ऐकण्यासाठी हजारांहून अधिक लोकांनी गर्दी केली आहे. याआधीही गुजरातमधील पालनपूर आश्रमाचा एक व्हिडीओ समोर आला होता. 14 जानेवारी रोजी राजस्थान उच्च न्यायालयानेही जोधपूर बलात्कार प्रकरणात आसारामला 31 मार्च 2025 पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.