रॅपिडो 25,000 महिलांना देणार रोजगार

नामांकित  कॅब अॅग्रीगेटर कंपनी रॅपिडो महिलांसाठी खास उपक्रम सुरू करणार असून यामुळे जवळपास 25 हजार महिलांना रोजगार मिळेल. आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच पॅब, ऑटो आणि बाईक चालवू शकत होते. मात्र, आता रॅपिडो बाईक चालवताना महिलाही दिसतील. पॅब बुकिंग सुविधा देणारी पंपनी रॅपिडो कर्नाटकात पिंक रॅपिडो बाईकचा नवीन ताफा आणणार आहे. खासकरून महिलांसाठी असलेला हा उपक्रम चालू वर्षाच्या अखेरीस सुरू केला जाईल, असे पंपनीने स्पष्ट केले.