कोण आहे अभिनव चंद्रचूड… रणवीर अलाहबादियाचा खटला

गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियाज गॉट लेटेंट’मधील आक्षेपार्ह विधानांमुळे रणवीर अलाहबादिया हे नाव देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. याच रणवीर अलाहबादियामुळे आता आणखी एक नाव चर्चेत आले आहे. हे नाव आहे अभिनव चंद्रचूड. अभिनव चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात रणवीर अलाहबादियाच्या बाजूने केस लढवत आहेत. ते माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. अभिनव यांनी वडिलांच्या कार्यकाळात कधीही सर्वोच्च न्यायालयात खटला लढवला नव्हता. अभिनव चंद्रचूड हे एक कुशल वकील आणि लेखक देखील आहेत. त्यांनी स्टॅनफर्ड लॉ  स्कूलमधून डॉक्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ आणि मास्टर ऑफ द सायन्स ऑफ लॉ पदवी प्राप्त केली आहे. अभिनव यांनी 2008 मध्ये मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. हॉवर्ड लॉ स्कूलमधून कायद्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.