रोहित, यशस्वीसह सर्वच फेल; दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या गतविजेत्या मुंबईचा जम्मू-काश्मिरकडून पराभव

मुंबई आणि जम्मू काश्मिरमध्ये पार पडलेल्या रणजी सामन्यात जम्मू काश्मिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईचा 5 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने दिलेले 205 धावांचे आव्हान जम्मू काश्मिरने 49 षटकात पूर्ण केले आणि 5 विकेटन सामना जिंकला. या विजयासोबत जम्मू काश्मिरने ग्रूप ए मध्ये 29 गुणांची कमाई करत पहिले स्थान पटकावले आहे.

मुंबईतील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात क्रीडाप्रेमींना मुंबईच्या संघाकडून जास्त अपेक्षा होत्या. कारण मुंबईच्या संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर या खेळाडूंचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या सर्वच खेळाडूंनी आपला चमकदार खेळ दाखवला आहे. परंतु दोन्ही डावांमध्ये हे दिग्गज फलंदाज जम्मू काश्मिरच्या गोलंदाजांपुढे टीकू शकले नाही. शार्दूल ठाकुरने दोन्ही डावांमध्ये (51 आणि 119 धावा) दमदार फलंदाजी केली परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईचा पुढचा सामना आता मेघालयविरुद्ध होणार आहे.

ठाकूरचे शोले, मुंबईने जम्मू-कश्मीरला विजयापासून दूर ढकलले