राणी मुखर्जी पुन्हा ‘मर्दानी’च्या भूमिकेत

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत दिसणार आहे. राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी-3’ चित्रपटाची घोषणा शुक्रवारी झाली.

‘मर्दानी-2’ रिलीजच्या वर्धापन दिनानिमित्त यश राज फिल्म्सने ‘मर्दानी-3’ची घोषणा करत एक पोस्टर शेअर केले. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘‘प्रतीक्षा संपली! ‘मर्दानी-3’मध्ये राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत दिसणार आहे.