
झारखंडमधील रांचीमध्ये भटक्या कुत्र्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटका कुत्रा नागरिकांना त्रास देत होता. या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच रागातून एका वक्तीने रस्त्यावरच्या त्या कुत्र्याला गोळी मारून ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच एक कुत्रा अनेक लोकांना त्रास देत होता. अनेकांवर हल्ला करत त्याने चावा घेतला होता. याच रागातून आरोपीने रस्त्याच्या मधोमध असलेल्या या कुत्र्यावर गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राइफल लेकर खुलेआम घूम रहे एक शख्स ने मासूम कुत्ते पर गोली चला दी! ऐसी क्रूरता बर्दाश्त नहीं की जा सकती। @RanchiPolice कृपया तत्काल कार्रवाई करें और ऐसे निर्दयी व्यक्ति को सलाखों के पीछे भेजें। हम न्याय की माँग करते हैं!@DC_Ranchi @HemantSorenJMM#JusticeForAnimals… pic.twitter.com/mgSUhok0h9
— We Are Ranchi 🇮🇳 (@WeAreRanchi) April 8, 2025
कुत्र्याला मारणे किंवा इजा करणे हा गुन्हा असल्याने त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीला कुत्र्याला मारण्याप्रकरणी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.