
व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने रणबीरने त्याचा नवा ब्रँड ARKS लाँन्च करत चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. वांद्रे येथील 201 वॉटरफिल्ड रोड येथे रणबीरने व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी त्याच्या नव्या ब्रॅंडच ओपेनिंग केले आहे.
आलिया भट्टनेही तिच्या इंस्टाग्रामवर याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.रणबीरच्या ब्रँडच्या काही वस्तूंसोबत आलियाने तिचे फोटो शेअर केले आहेत, यामध्ये फोटोंसह आलियाने कॅप्शन लिहिले की,”मी तुझ्या शूजमधून खरंच आता चालू शकते @ARKS अभिनंदन रणबीर, तुझे स्वप्न पूर्ण झाले आहे.”
View this post on Instagram
या ब्रँडमध्ये कॉटन जर्सी टी-शर्ट, प्लश एम्बॉस्ड फ्रेंच टेरी स्वेटशर्ट, निटेड हूडीज, डबल पिक पोलो शर्ट, फ्लॅट निटेड टी-शर्ट आणि लिनेन शर्ट यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये ऑप्टिक वॉश स्वेटशर्ट्स, कॉटन ट्विल आणि डेनिम जॅकेट्स, स्टायलिश डेनिम बाइकर जॅकेट, अल्ट्रा-लिमिटेड एडिशन लेदर रिव्हर्सिबल बॉम्बर जॅकेट इत्यादींचा समावेश आहे.