महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला 17 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून सकाळी 11 वाजता आमदारांशी तर दुपारी 1 वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.
नागपूर येथे होत असलेल्या या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे