काँग्रेस आमदार व पराभूत उमेदवारांबरोबर चेन्नीथला यांच्या उद्या स्वतंत्र बैठका, विधानसभेतील अनपेक्षित पराभवाबाबत चर्चा करणार

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बहुसंख्य जागा लढवूनही कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यासंदर्भात सर्व नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे मंगळवारी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

रमेश चेन्नीथल्ला 17 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य व 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून सकाळी 11 वाजता आमदारांशी तर दुपारी 1 वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी चेन्नीथला स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे असे निर्देश प्रदेश काँग्रेस कमिटीने दिले आहेत.