
आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. या पाश्र्वभूमीवर सुरक्षेच्यादृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
मंत्री रामदास आठवले शिर्डीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेणे योग्य नाही.’ दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अधिक दक्ष राहून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. धर्मांतर करून घेणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, असेही ते म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात आरपीआयला चार ते पाच जिल्हा परिषद जागा मिळाव्यात. जागा मिळाल्या नाहीत, तर काही ठिकाणी आरपीआय स्वतंत्र निवडणूक लढवेल. महायुतीला आरपीआयची आवश्यकता असल्यामुळे जागांबाबत योग्य समन्वय साधला जाईल, असेही मंत्री आठवले म्हणाले.
यावेळी विजय वाकचौरे, अण्णासाहेब वायदंडे, प्रकाश लोंढे, सुरेंद्र थोरात, पप्पू बनसोडे, संदीप सोनवणे, धनंजय निकाळे आदी उपस्थित होते.