अयोध्येतील ‘रामनवमी’ उत्सव JioHotstar वर लाइव्ह, अमिताभ बच्चन सांगणार श्रीराम जीवनगाथा

श्रीराम जन्मोत्सव म्हणजे ‘रामनवमी’ उद्या साजरी होत आहे. आणि अयोध्येतील रामनवमीच्या उत्सवाचा आनंद भाविकांना घरबसल्या घेता येणार आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मोत्सव जिओ हॉटस्टारवर लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन हे प्रभू श्रीराम यांची जीवनगाथा सांगणार आहे. रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम जिओ हॉटस्टारवर लाईव्ह दाखवला जाणार आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा… https://www.instagram.com/p/DH5TIDnssQH/?hl=en