
महाकुंभमेळ्याचा बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. 14 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या 45 दिवसांच्या कालावधीत अयोध्येत येऊन तब्बल 1.26 कोटी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. अयोध्येत येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे.