चार महिन्यांपूर्वी ईव्हीएमवर झालेल्या निवडणुकीत भाजप आमदार झाले, पण सह्याद्री साखर कारखान्यात मतपत्रिकेवर झालेल्या निवडणुकीत निम्मी मतेदेखील मिळाली नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी का@ँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकहाती जिंकली आहे. पाटील यांच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार तब्बल सात ते साडेसात हजार मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. त्यावरून खडसे यांनी एक्स पोस्ट करून भाजपवर निशाणा साधला आहे.
चार महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या ‘सहय़ाद्री कारखाना’ निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मतेही घेऊ शकला नाही, असे त्या म्हणाल्या.
– विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची चोहोबाजूंनी काsंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय पॅनेल उभा करण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी काँग्रेसचे निवास थोरात यांच्या मदतीने तिसरे पॅनेल उभे केले होते. त्रिशंकू लढतीत पाटील यांनी विरोधकांना चारीमुंडय़ा चीत करत 21-0 असा विजय मिळविला.