
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींची काही टवाळखोरांनी मुक्ताईनगरमध्ये छेड काढली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पण टवाळखोर आरोपी मिंधे गटातले असल्याचे समोर आले आहे. रक्षा खडसे यांनी आरोपींपैकी एकाशी फोनवर बोलताना त्यांनी कुणालाच सोडणार नाही असे बजावून सांगितले आहे. सोशल मिडीयावर ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.
ज्या आरोपींनी रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली त्या आरोपींचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो असल्याचे समोर आले आहे. ज्या आरोपींनी रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली त्या आरोपींची पियूष मोरे याने बचाव केला. रक्षा खडसे यांनी पियूष मोरेला फोन करून झापले. जुन्या मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलीचे व्हिडीओ शूट केल्याचे पियूषला विचारले. ती मुलं असं काही करत असता तु त्यांना जाब विचारायला हवा होता, कानाखाली मारायला हवी होती असे रक्षा खडसे म्हणाल्या.पोलिसांसमोर त्या आरोपींचा बचाव का केला अशी विचारणा खडसे यांनी मोरेला केली. पण यावेळी त्या मुलांनी असे काही केलेच नाही असे मोरे म्हणत होता. तसेच पोलिसांसमोरही आपण त्याचा बचाव केला नाही असे सांगत होता. पण या प्रकरणात सर्व आरोपींबाबत तक्रार केल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. यावेळी आरोपी मोरे ऐकूनही घेत नव्हता, इतकंच नाही तर असे काही झालंच नाही असेही म्हणत होता. दरम्यान आरोपी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.