राज्यसभा खासदाराला पुजाऱ्यानं मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून रोखलं; सोशल मीडियावर संताप

तमिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर येथील अंदाल मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यसभेचे खासदार इलैयाराजा यांना जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला सामोरे जावे लागले आहे.

तमिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर येथील अंदाल मंदिरात प्रसिद्ध संगीतकार आणि राज्यसभा खासदार इलैयाराजा यांच्या सोबत जातिभेदाचा संतापजनक प्रकार घडला. मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले. यानंतर त्यांना तिथून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचा निषेध केला जात आहे.

तमिळनाडूतील श्रीविल्लीपुथूर येथील अंदाल मंदिरात इलैयाराजा यांच्या सोबत जातीभेदाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना गर्भगृहात प्रवेश करण्यापासून रोखले. यानंतर त्यांना तिथून बाहेर जाण्यास सांगण्यात आले.

इलैयाराजा हे त्यांच्या संगीतासाठी जगप्रसिद्ध आहेत. इलैयाराजा यांनी प्रामुख्याने दक्षिणात्य चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी 7000 हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत. याशिवाय वीस हजारांहून अधिक मैफलींमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

इलैयाराजा यांना शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. हिंदुस्थानने त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. 2012 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.