मुन्ना-सर्किटची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातून मुन्ना आणि सर्किट या जोडीने मोठय़ा पडद्यावर धुमाकूळ घातला होता. संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी हे पात्र साकारले होते. आता मुन्नाभाई सीरिजविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. ‘मुन्नाभाई 3’ येणार असून सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याची घोषणां अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत लेखक- दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी केली.राजकुमार हिरानी म्हणाले, ‘मुन्ना भाई 3’ ची कथा लिहिणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. हा चित्रपट मला पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा चांगला बनवायचा आहे. चित्रपटाच्या कथेत काहीतरी नवीन जोडावे लागेल जेणेकरून लोकांना तो पाहता येईल. तथापि, माझ्याकडे एक अनोखी कल्पना आहे ज्यावर मी काम करतोय.