मालवण मधील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्धाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. या प्रकरणी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व रचना सल्लागार चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुरुवारी चेतन पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप त्यावेळी स्थानिकांनी केला होता. मात्र त्याकडे मिंधे सरकारने दुर्लक्ष केले होते. दरम्यान 26 ऑगस्ट रोजी अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पूर्णत: कोसळला होता.