90 तासांपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची! राजीव बजाज यांची रोखठोक भूमिका

कर्मचाऱयांनी आठवडय़ात कमीत कमी 90 तास काम करावे, अशी भूमिका एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम यांनी मांडल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सुब्रमण्यम यांचे हे विधान अनेकांना पसंतीस पडले नसून त्यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सुद्धा यावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजीव बजाज म्हणाले की, अशा पद्धतीचे काम प्रथम नेतृत्व पातळीवर लागू केले पाहिजे आणि नंतर त्या संपूर्ण संस्थेत लागू करायला हवेत, जेव्हा सर्व मोठय़ा चर्चा वरच्या पातळीवर होतात. तर, अंमलबजावणी खालून सुरू का करायची?. उलट कामांचे तास मोजण्याऐवजी त्या तासात केलेल्या कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यायला हवे, असे राजीव बजाज यावेळी म्हणाले.