राजस्थानच्या सांभर सरोवरात स्थलांतरित पक्ष्यांना रोगराई, या आजाराने 500 हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू

राजस्थानच्या सांभर सरोवरातील एक मोठी बातमी समोर आली आहे. 26 ऑक्टोबरपासून या सरोवरात अचानक 500 हून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. इतक्या प्रमाणात पक्ष्यांच्या मृत्यूने प्रशासन चिंतेत पडले आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 38 पक्षांना उपचारांनंतर सरोवरात सोडण्यात आले. उत्तर प्रदेशातील बरेली येथील सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूटकडून आलेल्या अहवालानुसार, स्थलांतरित पक्षांच्या या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. तपासात या पक्षांचा मृत्यू बोटुलिज्म या जिवाणुमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उपखंड अधिकारी जीतू कुल्हारी यांनी सांगितले की, आम्हाला 26 ऑक्टोबर रोजी पक्ष्यांच्या मृत्यूंबाबत माहिती मिळाली. यामुळे तेव्हापासून आतापर्यंत 520 पक्षांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, बोटुलिज्ममुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोटुलिज्म हा एक गंभीर आजार आहे. हा आजारात पक्षांचे पंख आणि पायांना अर्धांगवायू होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. जीतू कुल्हारी म्हणाले की, तलावातून मृत आणि आजारी पक्षांना वेगळे केले जात आहे. एसडीआरएफ, पशुसंवर्धन, वनविभाग आणि प्रशासनाची 10 पथके सरोवर परिसरात बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत. उपचारासाठी काम करत आहेत. जीतू कुल्हारी म्हणाले की, आजारी पक्षांची सुटका करुन त्यांना मिथरी येथे उभारण्यात आलेल्या मदत केंद्रात आणण्यात येत असून तेथे पशुसंवर्धन आणि वन विभागाचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

वन अधिकाऱ्याने सांगितले की, नागोर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, तर दुडू आणि जयपूर भागात मृत्यूचे प्रमाण कमी आहे. परिस्थितीचे नियमितपणे मूल्यांकन केले जात आहे आणि बाधित पक्ष्यांना वाचवण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यासाठी तीन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित मृतदेह बाहेर काढले जात आहेत.