डॉक्टरकडे चेकअप करून आणि घरगुती सामान खरेदी करून घरी परतत असताना कारला भरधाव जीपने धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. राजस्थानच्या बालोतरमध्ये मेगा हायवेवर ही दुर्घटना घडली.
शिवलाल सोनी (60), श्रवण सोनी(28), मंदीप सोनी(4), रिंकू सोनी(6 महिने) आणि ब्यूटी सोनी(25) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींना उपाचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सिंधुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्तळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून पुढील कारवाई करत आहेत.