ठाण्याचा खरा शिवसैनिक आजही जागेवरच – राजन विचारे

ज्या ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाली, तिथेच गद्दारीही झाली तरी खरा ठाणेकर निष्ठावंत राजन विचारे आजही शिवसेनेची मशाल घेऊन पुढे आहे, दबाव झुगारून उभा आहे, यामागील प्रेरणा काय? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता विचारे म्हणाले की, जे गेले ते लाभार्थी हेते. दोन नंबरचे धंदे व इतर बाबींमुळे ते पळाले. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आनंद दिघे यांच्यामुळे घडलो. शाखाप्रमुख ते खासदार हा प्रवास फक्त शिवसेना या चार अक्षरांमुळे घडला आहे.