
आमदार फुटल्यानंतर माझ्यापर्यंतही बरेच निरोप आले, उमेदवारी देऊ, असे सांगितले गेले. जवळची अनेक माणसं पलीकडे गेली, शिवसेना कधीही सोडणार नाही, हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द आहे. राजकारण संपलं तरी चालेल, पण मी निष्ठेशी तडजोड करणार नाही, असे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले. आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. समाजकारण करीत आलेले आमचे पुटुंब आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास ठाम आहे म्हणूनच माझ्या निष्ठेपुढे कधीच प्रश्नचिन्ह उभे ठाकले नाही.