हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता राज कपूर यांचे नुकतच जन्मशताब्दी वर्ष पार पडले. राज कपूर उत्तम अभिनेते तर होतेच शिवाय ते दिग्दर्शक, निर्मातेही होते.
पृथ्वीराज कपूर यांच्याकडून राज कपूर यांनी अभिनयाचे धडे घेतल्यानंतर वयाच्या 11 व्या वर्षी सिनेमांमध्ये काम करु लागले.
राज कपूर यांचा अभिनय असलेला ‘निलकमल’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता.
राज कपूर आणि नर्गिस या जोडीने एकाहून एक हिट सिनेमे दिले. मात्र नर्गिस यांचे सुनील दत्त यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर राज कपूर मद्याच्या आहारी गेले.
राज कपूर यांनी 1948 साली स्वत:चे प्रोडक्शन हाऊस ‘आरके फिल्म्स’ सुरु केले. पहिला सिनेमा त्यांनी ‘आग’ केला. या सिनेमासाठी त्यांनी एवढा खर्च केला की त्यांना चहा-नाश्त्यासाठी नोकरांकडून उधार घ्यावे लागले.
एवढेच नाही राज कपूर यांनी ‘आवारा’ सिनेमा बनवला. ज्याने त्यांना जगभरात ओळख मिळाली. 1970 मध्ये प्रदर्शित झालेला मेरा नाम जोकर हा सिनेमा तर त्यांना रस्त्यावर घेऊन आला. लोकांना पैसे देण्यासाठी त्यांना पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. ते नैराश्य़ात गेले.
मात्र राज कपूर यांनी हार पत्करली नाही. 1973 मध्ये त्यांनी ‘बॉबी’ हा हिट सिनेमा बनवला आणि तो त्यांच्यासाठी टर्निंग पॉईण्ट ठरला. ‘बॉबी’ या सिनेमातून त्यांनी ऋषी कपूर हा नवा हिरो इंडस्ट्रीला दिला.
एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी सांगितले होते की, आर के. स्टुडिओचा सर्वाधिक कलेक्शन करणारा सिनेमा म्हणून ‘मेरा नाम जोकर’ची नोंद आता झाली आहे.
राज कपूर यांच्या आयुष्यात चार्ली चॅप्लीनचा खूप प्रभाव होता.
सिनेसृष्टीत राज कपूर यांचे खूप मोठे योगदान आहे.