राज्यात सध्या मुसळधार पावसाने धुमशान घातले आहे. अनेक भागात पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस देखील अशाच प्रकारचा पाऊस पडणार असल्याने 10 वी व 12वीची उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूरला मुसळधार पावासाने झोडपले आहे. 26 जुलैला महाराष्ट्रात दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा होणार होत्या. त्या परिक्षा आता शिक्षण विभागाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 10वी चा पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर 12 वीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.