ऐन दिवाळीत रत्नागिरीत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी करण्याचा अनेकांनी बेत आखलेला असताना पावसाने त्यांच्या उत्साहावर विरजण घातले आहे.
आज रात्री पावणे नऊ वाजता ढगांच्सा गडगडाटासह पावसाचे आगमन झाले.ऐन दिवाळीत आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.हातातोंडाशी आलेल्या भात पीकाची कापणी व्हायची आहे.