आपण बऱयाचदा रेल्वेने प्रवास करतो. ट्रेनच्या एसी कोचमध्ये बर्थ बुक करणाऱया प्रवाशांना दोन चादरी, उशा, टॉवेल आणि ब्लँकेटसह एक बेड रोल दिला जातो. मात्र, प्रवासी अनेकदा तक्रार करतात की, ट्रेनमध्ये मिळणाऱया बेडशीट आणि ब्लँकेट्स अस्वच्छ असतात. आता याबाबत रेल्वेने माहिती दिली आहे.
एका आरटीआय अर्जाला उत्तर देताना, रेल्वेने सांगितलंय की, ट्रेनमध्ये प्रवाशांना दिलेली बेडशीट आणि ब्लँकेट महिन्यातून एकदा स्वच्छ केले जातात. ब्लँकेट ओले झाले किंवा त्यावर काही पडले तर ते मध्येच स्वच्छ केले जाते, अन्यथा ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. लोकरीच्या ब्लँकेटची देखभाल प्रक्रिया वेगळी असते. हाऊसकीपिंग कर्मचाऱयांच्या ब्लँकेटची स्वच्छता करण्यासाङ्गी कोणतेही नियमित निरीक्षण नाही. काही प्रवाशांनी तक्रार केली तर आम्ही तत्काळ ब्लँकेट स्वच्छ करून देतो, असे रेल्वेने म्हटले आहे.
लॉण्ड्रीचे कामकाज पंत्राटदारामार्फत
बेडशीट धुण्यासाङ्गी रेल्वेने देशभरात 46 विभागीय लॉण्ड्री तयार केल्या आहेत. रेल्वेने विभागीय लॉण्ड्री बांधली असली तरी ती चालवायला पंत्राटदाराला दिली आहे. पंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे अनेकदा डब्यांच्या बेडरोलच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षी रेल्वेने या लॉण्ड्रीच्या पंत्राट नियमात बदल केला. यापूर्वी हे पंत्राट दीर्घ कालावधीसाङ्गी दिले जात होते, परंतु नंतर ते कमी करून 6 महिन्यांचे करण्यात आले, असेही रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.