ताशी 180 किमी वेगाने धावली वंदे भारत स्लीपर, ग्लासातून पाण्याचा थेंबही सांडला नाही

देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपरची तिसऱया दिवशी यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने राजस्थानमधील कोटा आणि लबानदरम्यानच्या 30 किमी पट्ट्यात धावली. ट्रेनची क्षमता तपासण्यासाठी वळणदार ट्रकवर चाचणी घेण्यात आली. ट्रेन वेगाने धावत असताना ग्लासातून पाण्याचा एक थेंबही सांडला नसल्याचा व्हिडीओ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडीओमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावताना दिसतेय. वेग जास्त असूनही ग्लासातून पाणी जराही सांडले नाही. या गाडीची कोटा रेल्वे विभागातील दिल्ली-मुंबई ट्रकवर 31 डिसेंबरपासून चाचणी सुरू झाली आहे. सुरुवातीला नागदा आणि आता सवाई माधोपूर आणि कोटादरम्यान चाचणी सुरू आहे. लोड आणि अनलोड अशी वेगवेगळ्या वेगांची चाचणी घेण्यात येतेय.