रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. आता रेल्वेच्या हॉस्पिटलमधून औषधांची होम डिलिव्हरी होणार आहे. यासंदर्भात रेल्वेची ऑनलाईन फार्मसी सर्विसेससोबत बोलणी सुरू आहेत. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जानेवारी 2025 मध्ये निविदा काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना घरपोच औषधे मिळतील. रेल्वे रुग्णालयांमध्ये जर ही सेवा यशस्वी झाली, तर सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा सुरू केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे.