Raigad News – एसटीमध्ये शॉर्टसर्किट, अचानक धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट, बसमधून घेतल्या उड्या

एसटी बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झालं आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बसमध्ये धूर परसला. यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या घेतल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रायगडमधील म्हसळा येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली.

सदर बस दिघी-तुरुंबवाडी-म्हसळा मार्गे वडाळा मुंबई येथे चालली होती. बसमध्ये एकूण 30 ते 40 प्रवाशी होती. अचानक बसच्या केबिनमधून धूर निघू लागला आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी तात्काळ बसमधून उड्या घेतल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.