आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या महिलांना हेरून, त्यांना वाममार्गाला लावून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणार्या संजयनगर भागातील आंटीचा कदीम जालना पोलिसांनी पर्दाफाश करून कुंटनखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाई पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
जुना जालना भागातील संजयनगर भागातील जैस्वाल नामक महिला स्वतःच्या घरात कुंटनखाना चालवित असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून, एक बनावट ग्राहक पाठवून या कुंटनखान्यावर मंगळवारी रात्री कारवाई केली आहे. या कुंटणखान्यावर ग्राहकांना वेश्यागमन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या तीन महिला आढळून आल्या आहेत. या कारवाईत या कुंटनखान्याची मालकीणाला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्या घरात कंडोम पाकिटाचा साठा आणि रोख रक्कम आढळून आली आहे.
ही आंटी ग्राहकाकडून एक हजार रुपये घेऊन, त्यातील 700 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 300 रुपये पीडित महिलांना देत असे. तिथेआढळून आलेल्या तीन पीडित महिलांची अर्थीक परिस्थिती हलाखीची असून, त्यातील दोघी पतीपासून विभक्त आहेत. या कुंटनखान्यावर कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनीसुटकेचा निःश्वास सोडला आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी आंटीविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.