
मालवाहतूक टेम्पो व दुचाकीसह दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सातपैकी पाच आरोपींना वाहन व हत्यारांसह राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
सुखदेव रामदास खिलदकर (वय 30), साहिल सिकंदर सय्यद (वय 25, दोघे रा. नांदुर, ता. आष्टी, जि. बीड), अरुण बाळासाहेब बर्डे (वय 22), सोमनाथ रामदास गायकवाड (वय 27), शक्तिमान रामदास गायकवाड (तिघे रा. कुरणवाडी, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. बाळू गायकवाड, नवनाथ पवार हे फरारी आहेत.
नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या गुहा परिसरात संशयित इसम टेहाळणी करीत असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चौघांना पकडले. पोलिसांचा सुगावा लागताच तिघांनी दुचाकीवरून धूम ठोकली. त्यातील एकजण दुचाकीवरून पडल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी आरोपींकडून पाच धारदार शस्त्र्ा, दोऱया, वेगवेगळे पान्हे, केबल कटर, लोखंडी कत्ती, लाइटर असे साहित्य जप्त केले. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींवर बीडमधील अंभोरा, नगरमधील पारनेर व घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक धर्मराज पाटील, शाकूर सय्यद, प्रवीण अहिरे, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रवीण बागुल, विकास साळवे, आदिनाथ पाखरे, सतीश आवारे, बाबासाहेब शेळके, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱहाडे, सचिन ताजणे, नदीम शेख, गोवर्धन कदम, रोहित पालवे, गणेश लिपणे, अमोल भांड, सचिन धनाड, संतोष दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पुढील तपास करीत आहेत.