Rahuri crime news – शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबांची चोरी

फार्महाऊसवर कामाला असलेल्या कामगाराला शस्त्राचा धाक दाखवून 400 किलो लिंबांची चोरी करणाऱ्या चौघांना राहुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींना राहुरी न्यायालयात उभे केले असता तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर एकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विजय भिकाजी झावरे, अनिल उत्तम विधाते, चंद्रकांत मोहन बर्डे, ज्ञानेश्वर दादा घनदाट (सर्व रा. ताहराबाद, ता. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी जनार्दन सागर (वय – 60, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली.

राहुरी तालुक्यातील ताहराबाद शिवारात पहाटे चोरीची ही घटना घडली होती. शेतातील कामगारास चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून खोलीचे कुलूप तोडून 400 किलो लिंबू चोरून नेले होते. या घटनेची फिर्याद राहुरी पोलिसात दाखल करण्यात आली होती. या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार व ४०० किलो लिंबाचा तपास हेडकॉन्स्टेबल जानकीराम खेमनर करत आहेत.