आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकरने केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड आहे. त्याने समाजविघातक कृत्य केले आहे. त्यामुळे सोलापूरकरवर सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे या कलमांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शिवसेनेकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, उपशहरप्रमुख आबा निकम, राम थरकुडे, युवराज पारीख, प्रवीण डोंगरे, उमेश वाघ, अनिल दामजी, राजेंद्र शाह, मुकुंद चव्हाण, अजय परदेशी, सूरज लोखंडे, नितीन परदेशी उपस्थित होते.