मोदी आणि केजरीवाल एकसारखेच, राहुल गांधी यांचे टीकास्त्र

नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे एकसारखेच आहेत. दोघेही अदानींबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

मोदी आणि केजरीवाल यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हिंदुस्थानात गरीब अधिक गरीब होत आहेत तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत असे राहुल गांधी म्हणाले. सीलमपूर येथील सभेत ते बोलत होते. केजरीवाल सत्तेत आले आणि मी दिल्ली स्वच्छ करीन, भ्रष्टाचार नष्ट करीन  असा प्रचार केला. आता बघा काय झाले ते. बाहेर जाता येत नाही. खूप प्रदूषण आहे., असे राहुल गांधी म्हणाले. तर राहुल गांधी यांनी माझा प्रचंड अपमान केला.  परंतु, मी त्यांना प्रत्युत्तर देणार नाही. कारण ते त्यांचा पक्ष काँग्रेसला वाचवत आहेत आणि माझी लढाई ही देश वाचवण्यासाठी आहे, असे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.