राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर हल्ला चढवला. भाजप हिंदुत्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. मात्र जे लोक फक्त दिखाऊपणासाठी सतत हिंदुत्वाचा उदोउदो करीत असतात त्यांच्याकडूनच हिंसा, नफरत, असत्य अशा गोष्टी केल्या जात असल्याचा आरोपही केला. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात एकच गोंधळ घालत राहुल गांधी यांनी समस्त हिंदूचा अवमान केल्याचा आरोप करीत माफी मागण्याची मागणी केली. तसेच सभागृहाबाहेरही या वक्तव्याचे पडसाद उमटले. गुजरातमधील अहमदाबाद येथील गुजरात प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राहुल गांधींच्या पोस्टरला काळे फासले. तसेच दगडफेकही करण्यात आली. यावरून आता राहुल गांधींनी भाजपवर घणाघात चढवला आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी दुपारी ट्विट करत गुजरातमध्ये काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. “गुजरात काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड आणि हिंसक हल्ल्याने भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस विषयीचे माझे विधान खरे ठरवत आहे. हिंसाचार आणि द्वेष पसरवणाऱ्या भाजपच्या लोकांना हिंदू धर्माची मुलबूत तत्वेच कळलेली नाहीत. गुजरातच्या जनता त्यांचा खोटेपणा स्पष्टपणे पाहू शकते आणि भाजप सरकारला निर्णायक धडा शिकवेल. तसेच मी पुन्हा सांगतोय की, गुजरातमध्ये इंडिया आघाडी सरकार बनवणार आहे”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
गुजरात कांग्रेस कार्यालय पर हुआ कायरतापूर्ण और हिंसक हमला भाजपा और संघ परिवार के बारे में मेरी बात को और पुख्ता करता है।
हिंसा और नफ़रत फैलाने वाले भाजपा के लोग हिंदू धर्म के मूल सिद्धांतों को नहीं समझते।
गुजरात की जनता उनके झूठ के पार साफ देख सकती है और भाजपा सरकार को निर्णायक…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 3, 2024