मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील जामगेटजवळ मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. दोन तरुण लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींवर सशस्त्र हल्लेखोरांनी निर्घृण हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी आता लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘X’ अकाउंटवर या प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना अत्यंत वाईट आणि लाजिरवाणी आहे. मध्य प्रदेशात दोन लष्करी जवानांवरील हल्ला आणि त्यांच्या महिला साथीदारावर झालेला सामूहिक बलात्कार संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद आहे. भाजप शासित राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच नाही. येथे दररोज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत भाजप सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन फारच चिंताजनक असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
‘सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे देशातील महिलावर्ग असुरक्षित आहे. यामुळे हिंदुस्थानातील मुलींच्या स्वातंत्र्यावर, त्यांच्या इच्छा आकांक्षावंर मर्यादा घालल्या जात आहेत. सरकारला आणि समाजाला देखील याची लाज वाटली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेबाबत गांभिर्याने विचार केला गेला पाहिजे. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या रक्षणाच्या जबाबदारीकडे तुम्ही किती वेळ डोळेझाक करणार आहात? असा परखड सवाल यावेळी राहुल गांधी यांनी सरकारला केला.
मध्य प्रदेश में सेना के दो जवानों के साथ हिंसा और उनकी महिला साथी के साथ दुष्कर्म पूरे समाज को शर्मसार करने के लिए काफी है।
भाजपा शासित राज्यों की कानून व्यवस्था लगभग अस्तित्वहीन है – और, महिलाओं के खिलाफ़ दिन प्रतिदिन बढ़ते अपराधों पर भाजपा सरकार का नकारात्मक रवैया अत्यंत…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 12, 2024