संसदेचे लोकसभेचे अधिवेशन सोमवार पासून सुरू झाले असून केंद्रात कुंबड्यांच्या आधारे उभ्या राहिलेल्या नरेंद्र मोदी सरकारला पहिल्याच अधिवेशनात अग्निदिव्याला सामोरे जावे लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना त्याची झलक पाहायला मिळाली. इंडिया आघाडीचे 240 खासदार संविधानाची प्रत घेऊन संसदेत आले होते.
View this post on Instagram
लोकसभेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही खासदारांच्या शपथविधीने झाली. देशाचे पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रथम शपथ घेतली. मोदी शपथ घ्यायला जात असताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांना संविधानाची प्रत उंचावून दाखवली.
दरम्यान नीट घोटाळ्यावरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे खासदारकीची शपथ घ्यायला जात असताना विरोधी खासदारांनी ‘नीट’ ‘नेट’ अशा घोषणा दिल्या.