मणिपूर आजही धगधगतंय…; पीडित महिलांचे अश्रू आणि वेदना पाहून राहुल गांधीही हळहळले

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मणिपूरमध्ये येऊन नागरिकांना शांततेचं आवाहन करायला हवं. गेल्या वर्षीही मी मणिपूरमध्ये आलो होतो. आता पुन्हा आलोय. पण अतिशय खेदाची बाब म्हणजे मणिपूरमधील स्थितीत कुठलीही सुधारणा झालेली नाही. मणिपूरमधील स्थिती जशीच्या तशी आहे. आजही मणिपूर विभागलेलं आहे, असे राहुल गांधी म्हणाले. अखेर मणिपूरची दखल कधी घेणार? असा सावलही केला आहे.

राहुल गांधी यांनी मणिपूरमधील भेटीचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे मणिपूरमधील शरणार्थी शिबिरात पीडित नागरीक आणि महिलांच्या वेदना ऐकताना दिसत आहेत. अनेक महिला आणि तरुणी आपल्या व्यथा मांडताना दिसत आहेत. कित्येत महिला रडत रडत आपली करुण कहाणी राहुल गांधी यांना सांगत आहेत. अतिशय मन हेलावून टाकरणारे आणि अंगावर शहारे आणणाऱ्या मणिपूरच्या नागरीकांच्या वेदना आहेत. या व्हिडिओमधून राहुल गांधी यांनी मणिपूरमधील भयावह परिस्थिती सर्वांसमोर आणली आहे.

मणिपूरमध्ये अजूनही घरं जाळली जात आहेत. येथे हजारो निष्पाप नागरीकांचे जीव धोक्यात आहेत. हजारो कुटुंब शरणार्थी शिबिरांमध्ये राहण्यासाठी लाचार आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट द्यावी. येथील जनतेच्या समस्या आणि भावना जाणून घ्याव्यात. तसेच येथील परिस्थिती जाणून घ्यावी आणि शांततेचं आवाहन करावं, असे राहुल गांधी म्हणाले.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आणि ‘इंडिया’ आघाडीचे खासदार संसदेत पूर्ण ताकदीने आवाज उठवतील आणि सरकारवर दबाव आणतील. मणिपूरमधील परिस्थितीवरून सर्वांनी गंभीर होण्याची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्ना झाले पाहिजे की जेणेकरून मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता निर्माण होईल आणि नागरीकांना दिलासा मिळेल, असे राहुल गांधी म्हणाले.