मोदी-अदानी एक है, अदानी सेफ है! राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन

उद्योजक गौतम अदानी यांच्या लाचखोरी प्रकरणावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले. विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसदे परिसरात घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात घोषणा देत आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधीही होत्या.

अदानी लाचखोरी प्रकरणावरून आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘मोदी अदानी एक है, अदानी सेफ है’ असे लिहिलेले जॅकेट्स घातलेली होती. अदानींच्या घोटाळ्याने देशाची लाज काढली. मोदी यावर स्पष्टीकरण देणार का? (Adani Scam Is National Shame Modi Must Explain) अशा आशयाचे फलक घेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात घोषणा देत आंदोलन केले. विरोधी खासदारांनी मानवी साखळी करत संसदेच्या आवारात आंदोलन केले.

राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी यावेळी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोणी आपली स्वतःची चौकशी करेल का कधी? मोदी अदानींची चौकशी करूच शकत नाही. कारण चौकशी केली तर त्यांचीच चौकशी होईल. मोदी आणि अदानी एकच आहेत, दोन नाही, जोरदार टोला विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लगावला.