RSS आणि भाजप देशातील शिक्षण व्यवस्था आणि तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी INDIA आघाडीच्या विद्यार्थी संघटनांच्या जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसवक संघावर (आरएसएस) कडाडून टीका केली आहे. देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत स्वतःचा छुपा अंजेडा राबवण्यासाठी एक संघटन कार्यरत आहे. आरएसएस आणि भाजप असे त्यांचे नाव आहे. देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत ते तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

भाजप आणि आरएसएस देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या विचारात आहे. देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरएसएसने नियुक्त केलेले कुलगुरू आहेत. लवकरच राज्यांतील विद्यापीठांचे कुलगुरूही आरएसएसचे असतील. यंत्रणा त्यांच्या हातात पडली तर सर्व काही संपेल. देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कुंभमेळ्यावर बोलले होते. कुंभमेळ्यावर बोलणे चांगले आहे, पण त्यांनी देशाच्या भविष्याबद्दलही बोलले पाहिजे. त्यांनी बेरोजगारीविरुद्ध बोलावे. वाढत्या महागाईबाबत बोलावे, तरुणांच्या भविष्याबाबत बोलावे, वाढत्या महागाईबाबत बोलावे. मात्र, ते मूळ आणि गंभीर समस्यांवर बोलत नाहीत. मोदी सरकारने देशातील तरुणांना बेरोजगार केले, त्याबाबत आता जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण व्यवस्थेवर बोलले पाहिजे. मात्र, भाजपची सर्व यत्रंणा अंबानी-अदानी यांच्यासाठी काम करत आहेत. अनेक मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होत आहेत आणि जनता महागाईने होरपळत आहे. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. देशातील या समस्यांबाबत पंतप्रधांनी बोलले पाहिजे. भाजप आणि आरएसएस शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हातात शिक्षण व्यवस्था गेल्यास बेरोजगारीचे संकट आणि बिकट होणार आहे आणि तरुणांचे भवितव्यही उद्ध्वस्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आण्ही त्यांची विचारधारा नष्ट करण्यासाठी काम करू. विद्यार्थ्यांच्या हिताशी आम्ही तडजोड करणार नाही. आपण सर्वांनी मिळून सरकारचा सामना करू, असा निर्धारही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.