
वक्फ सुधारणा विधेयक आता मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणत आहे. मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी एक चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज यांनी केला. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डोळा ख्रिश्चनांच्या जमिनीवर आहे. संविधान ही एकमेव ढाल आहे, जी आपले अशा हल्ल्यांपासून संरक्षण करते. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असे त्यांनी ‘एक्स’ पोस्टमधून म्हटले.