राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला. अंतिम लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकपवर नाव कोरले. या वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. टीम इंडियाला चॅम्पियन बनवल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना राहुल द्रविड याने आपण बेरोजगार झालो असून चांगल्या ऑफरच्या शोधात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र लवकरच त्याचा हा शोध थांबण्याची चिन्हे असून इंडियन प्रीमियर लीगमधील 4 संघांमध्ये द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाला आहे.
हुल द्रविडशी करार करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या चार संघांमध्ये चूरस सुरू आहे. आयपीएलच्या आगामी हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी सर्वच संघ नवीन मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हे चार संघ राहुल द्रविडला आपल्या गोटात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसतेय. यामुळे मेगा चांगले खेळाडू हेरून मेगा ऑक्शनमध्ये त्यांना आपल्या ताफ्यात समाविष्य करता येईल. आता या चार संघांमध्येच सर्वाधिक चूरस का आहे हे पाहूया…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
या चार संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ राहुल द्रविडशी करार करण्यास सर्वाधिक उत्सुक आहे. याचे कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि द्रविडमधील बॉण्डिंग हे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बंगळुरु हे द्रविडचे होमटाऊन आहे आणि तिसरे कारण म्हणजे आतापर्यंत आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकला आलेले नाही. त्यामुळे द्रविडसोबत मिळून विजेतेपदाचे खाते उघडण्याचा प्रयत्न आरसीबीचा असेल.
दिल्ली कॅपिटल्स
बंगळुरूप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स संघालाही आतापर्यंत आयपीएल विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे हा संघही त्याची प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यास आघाडीवर आहे. विशेष म्हणजे द्रविडने याआधीही दिल्लीचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. गेल्या काही वर्षांपासून रिकी पॉण्टिंग ही धुरा सांभाळत आहे. मात्र दिल्लीला विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तो हे पद सोडू शकतो असा दावा अनेक रिपोर्टसमध्ये करण्यात आला आहे.
झोपेची डुलकी महागात पडली; वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळण्याची संधी गमावली, नक्की काय घडलं?
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर असून त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएल 2024 चा चषक जिंकला. मात्र लवकरच गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी केकेआर द्रविडला गळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजस्थान रॉयल्स
द्रविडने याआधीही राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याच गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ घातली जाईल अशी शक्यता आहे.
रो, तुझे खूप खूप आभार! प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली कृतज्ञता