हिंदुस्थानी संघाला यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ वर्ल्ड कपनंतर संपला, मात्र आता राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचे गुरुजी म्हणजेच प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड आयपीएलच्या कोणत्याही संघात सामील होऊ शकतात अशी चर्चा सुरू होती. अखेर त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाला आहे.
द्रविड यांनी राजस्थान रॉयल्ससोबत करार केला आहे. द्रविडचे या संघाशी जुने नाते आहे. आयपीएल कारकीर्दीत तो राजस्थानचा कर्णधार होता. यानंतर तो आता या संघाचा मार्गदर्शकही बनला. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर द्रविड यंदाच्या मेगा लिलावादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचे राजस्थान रॉयल्स संघाशी खूप चांगले संबंध आहेत.