‘रो, तू नोव्हेंबरमध्ये कौल केलास आणि प्रशिक्षकपदी कायम राहण्यास सांगितले, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. जगज्जेत्या संघाचे कौतुक करण्यासाठी केलेल्या भाषणात प्रशिक्षक राहुल द्रविडने कर्णधारच नव्हे, तर संघाच्या प्रत्येक खेळाडूने जी कठोर मेहनत केली, संघर्ष केला, जे बलिदान दिले आणि अब्जावधी हिंदुस्थानींना जो आनंद दिला, त्याबद्दल समस्त हिंदुस्थानींना गर्व असल्याचे सांगितले.’
हिंदुस्थानी जगज्जेत्या संघाचे कौतुक करणारा राहुल द्रविडचा एक व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला. त्या व्हिडीओत द्रविड भरभरून बोलला. ‘माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत, पण तुम्ही या अविश्वसनीय आठवणींचा भागीदार बनवलात त्याबद्दल सर्वांचे आभार. मला वाटते हे सर्व क्षण तुम्हाला आठवत असतील. एक विकेटबाबत नाही, हे धावांबाबतही नाही. तुम्ही तुमच्या कारकीर्दीलाही कधी आठवणीत ठेवणार नाहीत, परंतु आपण या क्षणांना कधीही विसरणार नाहीत. तर चला, या क्षणांचा आपण मनमुराद आनंद घेऊया.’
द्रविड पुढे म्हणाला, ‘मला तुमच्यावर यापेक्षा अधिक गर्व होऊच शकत नाही. ज्या पद्धतीने तुम्ही कमबॅक केलात, जसा संघर्ष केलात. जसे आपण आपल्या संघाला एक करण्यासाठी काम केले. जी दृढता दाखवली. गेल्या काही वर्षांत अपयशांना सामोरे जावे लागले. आपण लक्ष्यांना गाठू शकलो नव्हतो. मात्र आपल्या मुलांनी जे काम केलेय, तुम्ही सर्वांनी केलेय. सहकारी स्टाफने केलेय. आम्ही जी कठोर मेहनत केलीय, आम्ही जे बलिदान केलेय ते तुम्ही जाणता. तुम्ही जे मिळवलं आहे त्यासाठी तमाम देशवासीयांना तुमच्यावर गर्व आहे.’
‘खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी, मग ते आई-बाबा असोत, पत्नी असो, भाऊ-बहीण असोत, त्यांनी आपल्या जीवनात दीर्घकाळ अनेक त्याग केलेत. जेणेकरून ते एकत्रित या संस्मरणीय क्षणाचा आनंद घेऊ शकतील. संघाकडून मिळालेला पाठिंबा, दाखवलेल्या प्रेमासाठी मी आभारी आणि पृतज्ञ कधी होऊच शकत नाही. कर्णधार रोहित शर्माचेही आभार, ज्याने 2023 च्या वन डे वर्ल्डच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही संघ न सोडण्यासाठी मला मनवलं. द्रविडने बीसीसीआयच्या पडद्यामागील भूमिकेसाठीही आभार मानले.’