2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जगावर आणखी एका महामारीचे संकट घोंघावत आहे. अशातच आता एका नव्या तापाने धुमाकूळ घातलाय. ‘रॅबिट फीव्हर’ असे या तापाचे नाव आहे. या तापाचा मोठ्यांपेक्षा लहान मुलांवर जास्त परिणाम होत आहे.
रॅबिट फिव्हर हा दुर्मिळ आजार असून हा टुलेरेमिया बॅक्टेरियामुळे होतो. हा धोकादायक जीवाणू प्राणी आणि मानवांना संक्रमित करत आहे. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडिय़ाच्या वृत्तात देण्यात आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार साधारण 5 ते 9 वर्षे वयोगटातील मुलांना या तापाचा सर्वाधिक धोका असतो. धोकादायक जीवाणूंमुळे हा ताप पसरत आहे. मात्र या तापाचे प्रमाण अमेरिकेत जास्त प्रमाणत आढळून आले आहे. सध्या अमेरिकेत रॅबिट फिव्हर असलेली संख्या 56 टक्क्यांनी वाढली आहे. परंतु हिंदुस्थानात या आजाराची एकही केस आढळलेली नाही. त्यामुळे हिंदुस्थानींना चिंता करण्याचे कारण नसले तरी या आजाराबाबत खबरदारी घेणे महत्वाचे आहे. .
‘रॅबिट फीव्हर’ची लक्षणे
त्वचेवर जखम
कोणत्याही प्राण्यांना स्पर्श करणे टाळावे. जर तुम्ही एखाद्या संक्रमित प्राण्याला स्पर्श केला असेल. त्यामुळे हा ताप येई शकतो. तेव्हा त्याच्या त्वचेवरील जखम ही पहिली गोष्ट दिसते. जीवाणू शरीरात प्रवेश करतात त्या ठिकाणी ते हल्ला करतात.
तोंडात फोड येणे किंवा घसा खवखवणे
जेव्हा रॅबिट फीव्हर’ची लागण होते तेव्हा घसा खवखवणे किंवा तोंडात फोड यांसारखी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय टॉन्सिलिटिसही होऊ शकतात.
डोळ्यांची जळजळ आणि सूज
रॅबिट फीव्हर’ची लागण झाली असेल तर डोळ्यात जळजळ आणि सूज येते. जीवाणूंनी डोळ्यांमध्ये शिरकाव केला असेल तर असे होऊ शकते. यासाठी डटक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.