पाकिस्तानात शाहरुखबद्दल वाईट बोलल्यास भांडणे होतात

पाकिस्तानात जर एखाद्या व्यक्तीने पाकिस्तानी अभिनेत्याबद्दल वाईट बोलले तर लोक काही बोलणार नाहीत, परंतु जर कोणी शाहरुख खान याच्याबद्दल कोणी वाईट बोलले तर लोक अक्षरशः भांडायला लागतात. इतके प्रेम लोक शाहरुखवर करतात, असे पाकिस्तानी अभिनेता फैसल कुरेशी याने म्हटले आहे. बॉलीवूडचा बादशहा शाहरुखबद्दल वाईट कसं काय बोलू शकतोस, तुला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? पाकिस्तानातील लोक भारतीय कलाकारांवर खूप प्रेम करतात, असेही फैसल कुरेशी याने म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या पाकिस्तान-हिंदुस्थान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांशी मीडियाने संवाद साधला. त्या वेळी फैसलने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. शाहरुखचे कौतुक करताना फैसलने मात्र थोडी नाराजीसुद्धा व्यक्त केलीय. आमच्या कलाकारांना ज्या पद्धतीने हिंदुस्थानातून हाकलून लावण्यात आले, ते वाईट होते. ते आम्हाला अजिबात आवडले नाही. त्यांना वाईट वागणूक देण्यात आली. ते लोक आपला जीव मुठीत ठेवून पाकिस्तानात पोहोचल्याचेही फैसलने म्हटले आहे. विराट कोहलीचे किती चाहते आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. लोक त्याच्यावर भरपूर प्रेम करतात.