जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळात जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे तिकीट सहज उपलब्ध व्हावे, म्हणून रेल्वे प्रशासनाने स्मार्ट डिजिटल पाऊल उचललंय. त्यानुसार, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना क्युआर कोड असलेले ग्रीन जॅकेट दिले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना क्युआर कोड स्कॅन करून युटीएस ऍप सहज डाऊनलोड करता येईल. या सुविधेमुळे तिकीटांसाठी रेल्वे स्थानकात मोठय़ा रांगा लावण्याची गरज पडणार नाही. 13 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा होणार आहे. यावर्षी कुंभमेळयाला देशविदेशातून 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रेल्वेची 560 पेक्षा जास्त तिकीट काऊंटर असून त्यावर दररोज 10 लाख तिकीटांचे बुकींग होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेय.
क्युआर कोड जॅकेटमुळ तिकीटांचे बुकींग झटपट होईल. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही. भाविकांनी क्युआर कोड स्कॅन केल्यास त्यांना युटीएस ऍपवरून अनारक्षित डिजिटल तिकीट काढता येईल. प्रवाशांचा वेळ वाचेल, रांगा लावण्याचे टेन्शन नसेल जेणेकरून प्रयागराजमधील रेल्वे स्टेशनवरची गर्दी कमी होईल.