रेल्वेचे तिकीट बुक करताना आता मेट्रोचे तिकीटही काढता येणार आहे. सध्या दिल्ली मेट्रोपुरती ही सुविधा सुरू झाली आहे. आता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची क्यूआर कोड आधारित तिकिटे आता आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवरही बुक करता येतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्यांना तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
मेट्रोची तिकिटे ज्याची वैधता एक दिवसाची होती ती आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून आता 120 दिवस अगोदर बुक करता येतील आणि ते तिकीट चार दिवसांसाठी वैध असेल. तिकिटाची वैधता प्रवासाच्या तारखेच्या आदल्या एका दिवसापासून सुरू होईल. म्हणजे तुम्ही लवकर पोहोचलात किंवा उशिरा पोहोचलात तरी तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. त्याच मेट्रोच्या तिकिटावर तुम्ही प्रवास करू शकता. जर काही कारणास्तव ट्रेनचे तिकीट रद्द झाले तर मेट्रोचे तिकीट रद्द करता येईल.
l या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. तिकिटाचे प्रिंट आऊट काढून आपल्याकडे ठेवू शकतात किंवा पह्नमध्ये स्क्रीनशॉट किंवा तिकीट डाऊनलोड करून सेव्ह करू शकतात.
l ‘वन इंडिया वन तिकीट’ योजनेला प्रोत्साहन देताना प्रवाशांना तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयआरसीटीसी, डीएमआरसी, सेंटर फॉर रेल्वे इर्न्फोमेशन सर्व्हिस एकत्र आले आहेत. दिल्ली मेट्रो रेल्वेचे क्यूआर कोड आधारित तिकिटाचे मोबाईल अॅप बीटा व्हर्जन बुधवारी लाँच करण्यात आले.